संभाजी महाराज इतिहास माहिती मराठी
शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे ते जेष्ठ पुत्र. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी ९ वर्षे राज्य केले. मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्य तसेच सिध्दी आणि पोर्तुगीज यासारख्या अन्य शेजारील शासकांविरुद्ध लढा देत उभे होते.
संभाजी महाराजांचा इतिहास आणि कर्तृत्व
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आज्जी राजमाता जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.
संभाजी महाराजांचा पराक्रम
संभाजी महाराजांनी गनिमी कावा च्या पुरेपूर वापर करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. त्यात महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी १२० पैकी एकही लढाई हारली नाही. संभाजी महाराज असे एकमेव योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला होता. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध आणि औरंगजेबाला मदत करायची हिंमत झालेली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेबला कित्येक वर्षात एक सुद्धा विजय मिळाला नसल्याने तो चवताळून उठला होता.
संभाजी महाराज आणि दिलेर खान यांचा इतिहास – संभाजी महाराज इतिहास माहिती मराठी
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर दक्षिण दिग्विजय करण्यासाठी कर्नाटकमध्ये स्वारी करत असताना (नोव्हेंबर १६७६) संभाजीराजांना शृंगारपूरला राहण्याची अनुज्ञा दिली होती. काही इतिहासकारांच्या मते कदाचित सावत्र आई सोयराबाईंच्या सहवासात त्यांना रायगडावर ठेवणे महाराजांना इष्ट वाटले नसावे. तर काहींच्या मते दिलेर खानला खेळवत ठेवण्यासाठी महाराजांनी हि खेळी केल्याचे म्हटले आहे.
शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करत असताना, औरंगजेबाने दिलेर खानला मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी १५००० फौज देऊन पाठवले होते. शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असताना एवढ्या मोठ्या फौजेला तोंड देणे जिकिरीचे काम होते. त्यात अनेक मावळ्यांचा हकनाक बळी गेला असता. दिलेर खान मराठा साम्राज्यात पोचताच, संभाजी महाराजांनी दिलेर खान बरोबर पत्रव्यवहार चालू केला आणि स्वराज्यात त्यांची होणारी हेळसांड सांगितली. दिलेर खान यावर आनंदी झाला आणि त्याने संभाजी महाराज यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करत मुघल साम्राज्यात येण्याची विनंती केली. संभाजी महाराज यांनी यावर अत्यंत सावध आणि सावकाश भूमिका घेतली.
“छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असल्याने स्वराज्याची जबाबदार आमच्याकडे असल्याने तूर्तास आम्हांस आपल्याकडे येणे शक्य नाही” असे सांगत संभाजी महाराजांनी दिलेर खान यास अनेक महिने खेळवत ठेवले.
मुघल साम्राज्यात आल्यास दिलेर खानला कितीची मनसबदारी मिळणार, त्यांच्या पदावर साधारण ६ पत्रव्यवहार झाले होते. प्रत्येकवेळी संभाजी महाराजांनी औरंगजेबाची परवानगी मागितली असल्यामुळे प्रत्येक पत्रासाठी दिलेर खानाला औरंगजेबाची परवानगी घेण्यासाठी त्याचे माणसांना पाठवावे लागे. यात अनेक महिने गेले. या पत्रव्यवहारादरम्यान दिलेर खानाची फौज सुस्तावली होती आणि खर्च वाढत गेला. संभाजी महाराजांनी राजकारणातील गनिमी कावा करुन दिलेर खानला स्वराज्यात चांगलेच अडकून ठेवले होते.
त्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज एप्रिल-मे १६७८ दरम्यान कर्नाटकमध्ये स्वारीवरून परतले, त्यांनी राजांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला (नोव्हेंबर १६७८). तिथून संभाजीराजे एक महिन्याने, दिनांक १३ डिसेंबर १६७८ रोजी गडावरून माहुली येथे आले आणि मोगलाईत दिलेर खानाकडे गेले.
अशा रीतीने संभाजीराजे स्वराज्यातून शत्रूपक्षात सामील झाले. दिलेर खानाने याचा फायदा घेऊन मराठी मुलखातील प्रदेश जिंकण्यास सुरूवात केली. दोघांनी काही गड घेतले. १७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड जिंकला, ७०० माणसे कैद केली. त्यांतील प्रत्येकाचा एक एक हात कापून त्यांना सोडून दिले, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत वेगळे दाखवले असून त्यात मावळ्यांचे हात तोडण्यास संभाजी महाराजांनी विरोध केला होता असे दाखवले आहे. यात इतिहासकारांच्यात मतभेद आहेत. त्यानंतर संभाजी व दिलेर खान यांनी काही ठाणी घेऊन, मंगळवेढे जिंकून विजापूरच्या बाजूस गेले. त्यांनी जालगिरी, तिकोटा, होनवड या मार्गाने अथणी गाठली. संभाजी महाराज आणि दिलेर खान यांच्यात मतभेद वाढत होते.
संभाजी महाराजांना अनेक निर्णयात डावलल्याने संभाजी महाराज दिलेर खानावर नाराज झाले. याच सुमारास दिलेर खान व संभाजी यांत मतभेद होऊन राजे गुप्तपणे स्वराज्यात पन्हाळ्यास आले (२१ डिसेंबर १६७९) आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवले.
आप नीचे दिए गए लिंक का उपयोग करके संभाजी महाराज इतिहास माहिती मराठी PDF में डाउनलोड कर सकते हैं।