Tulsi Vivah Mangalashtak Marathi PDF

0.28 MB / 5 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
Tulsi Vivah Mangalashtak Marathi

Tulsi Vivah Mangalashtak Marathi

Tulsi Vivah: A Celebration of Love and Devotion

हिंदू धर्मात, तुलसी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्याच्या देवउठनी शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरा केला जातो. देवउठनी एकादशीला चार महिन्यांच्या झोपेनंतर भगवान विष्णू जागे होतात. यानंतर सर्व प्रकारचे शुभ कार्य सुरू होते. तुळशी विवाहात माता तुळशीचा विवाह शालिग्रामशी होतो.

जो तुळशी विवाहाचा विधी करतो त्याला कन्यादानाएवढे पुण्य मिळते. तुलसी विवाह कसा केला जातो, हे जाणून घेऊया. त्याची पूर्ण पद्धत आणि पूजेची वेळ काय आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही **Mangalashtak PDF** in Marathi सहज डाउनलोड करू शकता.

Mangalashtak in Marathi – Tulsi Vivah Mangalashtak Marathi

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मंगलम || १ ||

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्तमुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वो मंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीच्या नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

तुळशी विवाहाची पूजा कशी करावी मराठीत | Tulsi Vivah Pooja Vidhi in Marathi

  • तुळशीचे वृंदावनाची गेरू चुन्याने आणि फुलांनी सजवा.
  • त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात.
  • तुळशीला हळद व तेल लावून मंगल स्नान घालावे.
  • तुळशीच्या रोपाभोवती उसाचा मंडप बनवा.
  • तुळशीच्या रोपावर लाल ओढणी अर्पण करा.
  • तुळशीला बांगड्या, नथ आणि मेकअपच्या इतर वस्तू अर्पण करा.
  • श्री गणेश आणि शालीग्रामची (भगवान विष्णू) विधिवत पूजा करावी.
  • भगवान शालिग्रामच्या मूर्तीचे सिंहासन हातात घेऊन तुळशीची सात प्रदक्षिणा करा.
  • नंतर तुलसीची आरती मराठीत म्हणावी व नंतर लग्नात म्हणतात त्या मंगलाष्टके गाण्याने विवाह सोहळा पूर्ण केला जातो.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही **मोफत मंगलाष्टके मराठी PDF** / Mangalashtak in Marathi PDF डाउनलोड करू शकता.

Download Tulsi Vivah Mangalashtak Marathi PDF

Free Download
Welcome to 1PDF!