Lek Ladki Yojana Form
लेक लाडकी योजना के तहत लड़की के जन्म के बाद महाराष्ट्र सरकार 5000 रुपये देगी। फिर बालिका के पहली कक्षा में प्रवेश करने पर 6000 रुपये मिलेंगे। तीसरी किस्त लड़की के छठवीं कक्षा में पहुंचने पर मिलेगी। तब राज्य सरकार की ओर से 7000 रुपये की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी।
इस योजना का उद्देश्य लड़कियों को सशक्त बनाना है। विशेष तौर पर लेक लाडकी योजना राज्य के पीले और नारंगी राशन कार्ड वाले परिवारों की लड़कियों के लिए है। इस योजना के तहत बेटी के जन्म के बाद 5000 रुपये दिए जाएंगे। उसके बाद चरणबद्ध तरीके से राज्य सरकार द्वारा पैसे सीधे खाते में भेजे जाएंगे।
लेक लाडकी योजना अटी आणि शर्ती (पात्रता निकष)
- लेक लाडकी योजने साठी केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली पात्र असणार आहेत.
- दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर केवळ मुलीलाच लाभ मिळणार आहे.
- जर 1 एप्रिल 2023 आगोदर मुलगी जन्माला आली असेल, तरी देखील त्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. (सुधारित) माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून, त्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
- पहिल्या आपत्या च्या पहिल्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना, माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र इतर कागदपत्रांसोबत सादर करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थी कुटुंब हे कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेन आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांचे बँक खाते हे महाराष्ट्रातील कोणत्याही बँकेत असावे, इतर राज्यातील बँक खाते गृहीत धरले जाणार नाही.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये 1 लाख पेक्षा जास्त नसावे, आढळल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला
- कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे) सोबत तहसीलदाराचा दाखला आवश्यक आहे.
- लाभार्थी मुलीचे आधार कार्ड (केवळ पहिल्या हप्त्या वेळी सादर करणे आवश्यक)
- मुलीच्या आई – वडिलाचे आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स (फक्त पहिल्या पानाची)
- रेशन कार्ड झेरॉक्स (केशरी किंवा पिवळे) [पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स]
- मतदान कार्ड ओळखपत्र (शेवटच्या हप्त्या वेळी जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल)
- शाळेचा बोनाफाईड (मुलगी ज्या वर्गात शिकत आहे त्या संबधित लाभ मिळवण्यासाठी)
- माता पित्यांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (केवळ दोन आपत्य असल्यास)
- मुलीचे अविवाहित प्रमाणपत्र (18व्या वर्षी अंतिम हप्ता 75 हजार मिळवण्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा) सोबत स्वयं घोषणापत्र