Dasbodh Marathi Book
दासबोध
दासबोध, मराठी में शिथिल अर्थ “शिष्य को सलाह”, 17 वीं शताब्दी का अद्वैत वेदांत आध्यात्मिक पाठ है। इसे संत समर्थ रामदास ने अपने शिष्य कल्याण स्वामी को मौखिक रूप से सुनाया था। दासबोध पाठकों को भक्ति और ज्ञान प्राप्त करने जैसे मामलों पर आध्यात्मिक मार्गदर्शन प्रदान करता है।
महाराष्ट्रांत, महाराष्ट्रधर्माचा उदय होऊन मोंगलांच्या जाचांतून त्याची सुटका होण्यापूर्वी जें संतमंडळ उद्भूत झालें व कै. न्या. रानडे यांच्या मताप्रमाणे ज्या संतमंडळीनें राष्ट्रीय स्वातंत्र्याचे बीजारोपण करण्याकरितां जमीन तयार केली, त्यांत श्रीसमर्थ रामदास हे अग्रेसर होत. सदर न्याय मूर्तीनीं आपल्या ‘मराठ्यांच्या इतिहासां’त वर्णिलेल्या संतमालिकेत श्रीसमर्थां चा उल्लेख जरी प्रमुखत्वानें करण्यांत आलेला आहे, तरी त्या वेळी त्यांच्यासंबंधानें सध्यां उपलब्ध असलेली माहिती अप्रसिद्ध असल्यामुळे न्यायमूर्तींना समर्थां च्या कृतीचे व योग्यतेचें यथास्थित शब्दचित्र रेखाटतां आलेलें नाहीं.
तथापि महाराष्ट्रांत महाराष्ट्रधर्माचा प्रसार करून मराठ्यांना राष्ट्रीय वैभव प्राप्त करून देण्याचा उद्योग करणाऱ्यांत समर्थ रामदास हे प्रमुख होते, असे त्यांनी नमूद करून ठेवले आहे; मात्र त्यांनी ह्या उद्योगाचें सर्वच श्रेय सम त्याचा कांहीं वाटा इतर संतांच्या पदरींहि घातलेला आहे.