
Budhbhushan Book Marathi
बुधभूषण हा स्वतंत्र ग्रंथ नसून, यामध्ये असलेले अनेक श्लोक संग्रहित आहेत. अर्थातच, हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आहे हे दिसून येते. वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथातून संभाजी महाराजांनी राज्य प्रशासन / राजनीती या विषयांना धरून निवडलेले श्लोक आणि त्यांचे योग्य वर्गीकरण करून त्या त्या विषयानुसार शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.
बुधभूषण ग्रंथामध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयांवर श्लोक आहेत. तसेच, सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत.
सुमारे ८९ विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची, वृक्षांची उदाहरणे देऊन व्यंग रूपाचा खुबीदार वापर बुधभूषण मधील श्लोकांत झाला आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बुधभूषण पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकता. बुधभूषण वाचून झाल्यावर आपले अभिप्राय नक्की कळवा