शिवचरित्र मराठी पुस्तक (Shivcharitra Marathi Book) PDF

2.03 MB / 130 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
शिवचरित्र मराठी पुस्तक (Shivcharitra Marathi Book)
Preview PDF

शिवचरित्र मराठी पुस्तक (Shivcharitra Marathi Book)

छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली.

मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरूष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य! आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार अन् अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.

Download शिवचरित्र मराठी पुस्तक (Shivcharitra Marathi Book) PDF

Free Download
Welcome to 1PDF!