मराठी व्याकरण पुस्तक
भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने बोलावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत या नियमांनाच व्याकरण असे म्हणनीत। भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच भाषेचे व्याकरण होय, व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. व्याकरण हा शब्द।
“भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय असे श्रीपाद ते यांनी म्हटले आहे, भाषेची घडण समजून घेताना प्रथम लक्षात येते कि भाषा वाक्यांनी बनते, वाक्य शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णानी बनतात व्याकरणाच्या अभ्यासाथै । वर्णविचार २. शब्दविचार 3. वाक्यविचार असे घटक आहेत
मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + (कृ(->करणे) = व्याकरण. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलीने व्याकरणास ‘शब्दानुशासन’ असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.