छावा कादंबरी
शिवाजी सावंत लिखित छावा ही मराठी कादंबरी आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात मला आणि माझा टीम ला असे दिसून आले की, छावा कादंबरी पीडीफ मध्ये मोफत डाउनलोडींग साठी खूप जण शोधत आहेत. म्हणून हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे कि छावा एका सिंगल क्लिक वर उपलबद्ध करून दयावी . या कादंबरीचे सर्व माहिती अधिकार/ कॉपीराइट्स अर्थात स्वतः लेखकाचे असून आम्ही फक्त ज्ञानप्रसारा साठी छावा कादंबरी मराठी मध्ये मोफत डाउनलोडींग ला देत आहोत.
छावा कादंबरी प्रस्तावना
संभाजी राजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजी महाराज हे शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जीवनकाळ जन्मापासूनच बिकट आणि अतिशय कठीण होता पण तरीही सर्व परिस्थितींशी सामना करत हे शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले.
शंभूराजे जन्मता च सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकले आणि त्यांची दूध आई बनल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ. संभाजीराजे अत्यंत चाणाक्ष असल्यामुळे त्यांनी राजकारणातील बारकावे भराभर आत्मसात केले. लहान वयातच काही घटना मुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले, अवघ्या ९ व्या वर्षी आग्ऱ्याहून सुटकेचा थरार त्यांनी अनुभवला, सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या स्वतःचा निधनाच्या खोटया अफवेमुळे त्यांना बराच काळ भूमिगत राहावे लागले. इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणात तरबेज झाले होते.
राज्याभिषेकानंतर १२ दिवसांत झालेल्या जिजाबाईच्या निधना मुळे संभाजीराजे मायेने पोरके झाले. शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले असताना, अण्णाजी दत्तों, सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. हेच ते कारण होते ज्यामुळे तरुण संभाजीराजांचे दरबारातील अनुभवी प्रधान मंडळाशी मतभेद होऊ लागले. यामुळे पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा अप-प्रचार सुरू केला.