15 ऑगस्ट भाषण मराठी PDF

0.86 MB / 10 Pages
0 likes
share this pdf Share
DMCA / report this pdf Report
15 august bhashan marathi
Preview PDF

15 ऑगस्ट भाषण मराठी

15 ऑगस्ट भाषण मराठी लहान मुलांसाठी

माननीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षकगण, आणि माझ्या प्रिय मित्रांनो,

आज आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत, कारण आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाने ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्तता मिळवली आणि आपण स्वतंत्र झालो. आजचा दिवस आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो, ज्यांनी आपले जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि इतर अनेक वीरांनी आपल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची संघर्ष आणि त्याग यामुळेच आपण आज मुक्त आणि स्वतंत्र भारतात जीवन जगू शकतो. त्यांची स्मृती आपल्या हृदयात सदैव जिवंत राहील.

आजचा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही, तर आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा आहे. आपला देश प्रगतिशील आणि समृद्ध बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण यासारख्या मुद्द्यांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.

आपल्या देशाची एकता आणि अखंडता जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. चला, आपण सर्व एकत्र येऊन या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हे संकल्प करूया की, आपल्या देशाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न करू.

अखेर, मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद! वंदे मातरम!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण

घ्यावेत ही नम्म्र विनंती.

त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव

भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांनी हरीजनांच्या उद्धारासाठी अविरत कष्ट

केले, भारतीय राज्यघटनेचे काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांना ‘भातरत्न’ हा किताब

देण्यात आला.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.

जय हिंद…!

जय महाराष्ट्र…!

15 अगस्त पर छोटा भाषण 2024

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांचा,
ज्यांनी भारत देश घडवला.

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण येथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो, 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणास लावले. त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

चला तर सर्वांनी मिळून आपला भारत देश जगातील एक आदर्श देश बनविण्यासाठी प्रयत्न करूया.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद ! जय भारत ! वंदे मातरम.

Download 15 ऑगस्ट भाषण मराठी PDF

Free Download
Welcome to 1PDF!